येवल्यात शिंदे गट स्थानिक प्रश्नावर आक्रमक... प्रलंबित प्रश्नासाठी घेतली प्रशासनाची बैठक
दाखले,रेशन,शेती,रस्ते,शिक्षण कायदा सुव्यवस्था या मूलभूत प्रश्नांची सामान्य नागरिकांची होत होती परवड.
येवला : संवाददाता
येथील तालुका शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने आज तहसीलदार प्रांत अधिकारी गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी पुरवठा विभाग पोलीस प्रशासन यांच्या सह सर्व महत्त्वाच्या प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेट घेऊन तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना तात्काळ गती देऊन काम करून घ्या असे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तालुक्यामध्ये १८०० ते १९०० च्या शतकामधील असलेल्या जुन्या नोंदी यांच्या सर्व रेकॉर्ड तपासून ऑनलाइन पोर्टल ला टाकाव्यात तसेच शाळेमधील जुन्या नोंदी जन्ममृत्यूचे दाखले तसेच जिथे कुणबी नोंदणीचा उल्लेख असेल त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ऑनलाइन पोर्टलला करावी तसेच पुरवठा विभागामध्ये रेशन कार्ड साठी ग्रामीण भागातील लोकांना एक एक दोन दोन महिने चकरा मारावा लागत आहेत याबाबत पारदर्शकता आणावी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर २१ दिवसाच्या आत ऑनलाइन अर्ज स्वीकारला नाही तर तो बाद होतो त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा बसून ऑनलाईन केल्याच्या नंतर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून तो अर्ज स्वीकारल्या जावा तसेच रेशन कार्ड च्या संदर्भातील सर्व अडचणी तात्काळ दूर कराव्यात तसेच ज्यांनी नवीन क्षेत्र खरेदी केले आहे त्यांचे फार्मर आयडी निघत नसून त्यांच्या देखील तांत्रिक काही अडचणी आहेत त्याबाबत देखील तहसीलदार यांनी स्वतः लक्ष घालण्यात यावे तसेच संबंधित विभागाने लक्ष घालावे अशी देखील निवेदन शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आले .
पानंद रस्ते संदर्भातल्या जेवढ्या केसेस निकाली लागलेल्या नाही त्या संदर्भातील सर्व तक्रारदारांना बोलून तात्काळ त्या सर्व केसेस मार्गे लावाव्यात असे देखील निवेदनात म्हटले आहे. सध्या वृक्ष लागवड प्रकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याबाबत अजून जनजागृती करून तालुक्यातील प्रलंबित वृक्ष लागवडीच्या प्रकरणांना गती देण्यात यावी तसेच गोठ्यांची जी प्रलंबित प्रकरणी आहेत ते देखील तात्काळ मार्गी लावण्याची मागणी निवेदनात केली आहे. जवळपास तालुक्यातील साडेचार हजार प्रकरणे पंचायत समिती येथे पडून आहेत याबाबत देखील गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन उर्वरित प्रकरण मार्गी लावण्याची मागणी केली. तालुक्यामध्ये अनेक प्रशासकीय समितीच्या नियुक्ती देखील बाकी आहेत याबाबतचे पत्र तयार करून त्या समितींवरती तात्काळ नवीन लोकांचे नियुक्ती करण्याबाबत अहवाल तयार करावा तसेच आडगाव चोथवा बाबुळगाव धुळगाव येथे व तालुक्यामध्ये जिथे वरदळीचे ठिकाण आहे तेथे तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावे आरोग्य शिक्षण रस्ते पाणी याबाबत संबंधित विभागाशी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करून यावर मार्ग काढण्यासाठी निवेदन सादर केले , याबाबत प्रशासनाच्या वतीने प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन गटविकास अधिकारी संदीप वायाळ तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड पोलीस निरीक्षक अनिल भावारी,ए आर राजपूत पुरवठा विभागातील अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारपणे पुढच्या काळामध्ये तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत काळजी घेतली जाईल अशी शिष्टमंडळाला आश्वासित केले . दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन कामे मार्गी लावावेत अन्यथा पुढच्या वेळेस शिवसेना सुचवलेले सर्व काम स्वतः हातात घेईल व शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असे शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील,उपजिल्हाप्रमुख अमोल सोनवणे शेतकरी सेनेचे श्रावण देवरे सरपंच रामकृष्ण खोकले युवा सेनेचे तालुकाप्रमुख यश जगताप अंकुशराव निकम शरद कुदळ,शरद बोरणारे रामदास भागवत कारभारी ढोले, अभिजीत डुकरे अभिजीत शिंदे श्रावण ठोंबरे विशाल ठोंबरे गणेश कोटमे. यांच्यासह आधी शिवसेनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
