येवल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ते १३ सप्टेंबर यशोगाथेचे आयोजन
येवला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यशोगाथेचे आयोजन येवल्यात कलंत्री लॉन्स पाटोदा रोड, येवला येथे गुरुवार ११ सप्टेंबर ते शनिवार १३ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे, कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा,उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र कथा ऐकण्यासाठी बहु संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रामेश्वर कलंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा समिती येवला यांनी केले आहे.
येवल्यात गुरुवार 11 सप्टेंबर ते शनिवार 13 सप्टेंबर रोजी दररोज दुपारी 4 ते 7 दरम्यान या शिवकथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 11 सप्टेंबर या दिवशी शिवस्मृती, शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी शिवमंत्र, शनिवार 13 सप्टेंबर रोजी शिवदृष्टी, या विषयांवर सर्वांकष दृष्टिक्षेप परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या अमोघ वाणीतून स्पष्ट होणार आहे.
याशिवाय शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी विविध विद्यालयातील खास विद्यार्थी व युवकांसाठी खास शिवचरित्रावरती संवादाचे आयोजन केले आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथे साठी आपण आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रामेश्वर कलंत्री व आयोजन समितीने केले आहे.
दरम्यान ,११ तारखेला दुपारी ३ वाजता टिळक चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहरातून मोटर सायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅली शहरातून विविध मार्गावरून कार्यक्रम स्थळी पोहोचल्या नंतर दुपारी ४ वाजता कथेस शुभारंभ होणार आहे.
या ठिकाणी वॉटर प्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगसाठी लॉन समोर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

