मविप्र होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी
मविप्र होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरी
गोशाळा मैदान येथे पार पडलेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून त्यांची जिल्हास्तरावर व विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
चौदा वर्षाखालील गटात समृद्धी भड हिने जिल्हास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर तिची निवड झालेली आहे. तसेच ॲथलेटिक्स मध्ये विविध गटात स्वराज वरकड व सार्थक चव्हाणके प्रथम, साई साताळकर याने द्वितीय क्रमांक पटकावला असून या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच बुद्धिबळ स्पर्धेसाठी रक्षक उगले व घनश्याम वाकचौरे यांचीही जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
स्पर्धकांचे संस्थेचे संचालक नंदकुमार बनकर येवला तालुका क्रीडा अध्यक्ष नवनाथ उंडे प्राचार्या सुनिता हिंगडे, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
स्पर्धकांना क्रीडाशिक्षक नीरज शेख यांचे मार्गदर्शन लाभले.