येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
येवला :
येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट, कोटमगाव (देवीचे) यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त घटी बसलेल्या भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कोटमगाव येथील जगदंबा देवस्थानमधील खोली क्रमांक २ मध्ये होणार आहे.
हे शिबिर दि. २३/०९/२०२५ ते ०१/१०/२०२५ या कालावधीत रोज सकाळी ८ ते १० या वेळेत सुरू राहील. यामध्ये विविध दिवशी डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
शिबिरात सहभागी होणारे डॉक्टर्स:
* दि. २३/०९/२०२५: डॉ. महेश्वर तगारे, डॉ. अलंकार गायके
* दि. २४/०९/२०२५: डॉ. अविनाश विंचू, डॉ. बद्री जाधव
* दि. २५/०९/२०२५: डॉ. मनोज भांबारे, डॉ. कांचन भांबारे
* दि. २६/०९/२०२५: डॉ. संगीता पटेल मेम, डॉ. अनंत खांगटे
* दि. २७/०९/२०२५: डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. प्रतीक जाधव
* दि. २८/०९/२०२५: डॉ. रोहन पाटील, डॉ. धनराज काटे
* दि. २९/०९/२०२५: डॉ. तुषार साळुंके, डॉ. प्रियंका साळुंके
* दि. ३०/०९/२०२५: डॉ. प्रणव बमनावत, डॉ. ज्ञानेश धनगे
* दि. ०१/१०/२०२५: डॉ. सुजीत एलमामे, डॉ. राम खोकले
तरी घटी बसलेल्या भाविकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.