जिल्हा स्तरावर बाजी मारत बाभूळगावच्या संतोष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर निवड


जिल्हा स्तरावर बाजी मारत बाभूळगावच्या संतोष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर निवड


येवला,ता.१४ : नाशिक येथील शालेय जिल्हा स्तरीय शासकीय मैदानी स्पर्धेत बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून त्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.



जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय जिल्हा स्तरीय शासकीय मैदानी स्पर्धा नाशिक येथील नमीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये बाभूळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील व तालुक्याचे नेतृत्व करत  १४,१७ व १९ वयोगटातील खेळाडूने सहभाग नोंदवला होता.यामध्ये १४ वर्षे वयोगटातील मंगलशिंग पवार या खेळाडूने उंच उडी क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.१७ वर्ष वयोगट ओम तनपूरे या खेळाडूने अडथळा शर्यत या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक व १९ वर्ष वयोगट १०० मीटर रनिंग मध्ये समृध्दी चव्हाण प्रथम क्रमांक, लांब उडी क्रिडा स्पर्धेत अनुजा बोराडे प्रथम क्रमांक,भाला फेक स्पर्धेत सागर आहेर,प्रथम क्रमांक सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आपल्या विजयाचा झेंडा विभागीय स्पर्धेसाठी रोवला.यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक दत्तात्रय खोकले व सागर मुटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.खेळाडूंच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे,सचिव लक्ष्मण दराडे, संचालक रुपेश दराडे,प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे,महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एस. येवले, उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, विभाग प्रमुख विठ्ठलसिंग परदेशी,किरण पैठणकर,प्रदीप पाटील,अरुण जाधव, किरम गायकवाड,देवकर,राहुल गोलाईत,राऊसाहेब मोहन,मनोज खैरे यांनी खेळाडूंचा यथोचित सन्मान सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो

बाभूळगाव : विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार करताना संस्थेचे सचिव लक्ष्मण दराडे व शिक्षक.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने