येवल्यात कार सेवकांचा सत्कार : रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

येवल्यात कार सेवकांचा सत्कार : रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

येवला : पुढारी वृत्तसेवा


अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सनातन संस्कृतीच्या अस्मितेसाठी भगवान श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या येवला तालुक्यातील  60 कार सेवकांसह सनातन धर्मप्रेमी 140 युवकांचा स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. व रामोत्सव भजन संध्यामुळे भक्तिमय वातावरणात रामभक्त येवलेकर न्हाऊन निघाले.
 केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जनजाती कार्यमंत्री ना. भारतीताई प्रवीण पवार यांच्या प्रेरणेने,स्वीय सहाय्यक डॉ उमेश काळे 
व वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे व कार्यकर्ते यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राम भक्त बंधू व भगिनींनी उदंड असा प्रतिसाद दिला.
प्रारंभी भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, कारसेवकांचे  प्रतिनिधी सुनील सस्कर,गजानन जटे, ज्ञानेश्वर लूटे,आशिष भोजने, ज्ञानेश्वर सांबर,प्रशांत क्षीरसागर, यांच्यासह मान्यवरांनी प्रभु रामाच्या प्रतिमेचे पूजन,व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केले. प्रास्ताविकात भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम हे आपल्या सर्वांसाठी धैर्य, सय्यम, शौर्य आणि मर्यादेचे पालन करण्याचे प्रतीक आहे. अयोध्या येथील पवित्र श्री राम जन्मभूमी ही 496 वर्षानंतर मुक्त झाली असून पौष शुद्ध द्वादशी रोजी सोमवार, 22 जानेवारीला दिवाळी साजरी करत राम ज्योत प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. 4500 ओव्यांचे स्वलिखित रामायणकार निंबा शिनकर,यांचा यथोचित गौरव करण्यात आला. अमित हरिनामे यांच्यासह सहकाऱ्यांच्या सुमधुर आवाजात राम भजन संध्याचा कार्यक्रम संपन्न झाला.पैठणी उद्योजक श्रीनिवास सोनी यांनी बासरी वादन केले.रामआरती नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास लासलगाव मंडल अध्यक्ष निलेश सालकडे,विधानसभा विस्तारक गोविंद कुशारे,उपस्थित होते.
सुत्रांचलन दत्ता महाले यांनी केले. भाजप शहर अध्यक्ष मिननाथ पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी युवराज पाटोळे,संतोष काटे,बंटी धसे, गणेश खळेकर,बडाअण्णा शिंदे,मच्छीन्द्र पवार, दिनेश परदेशी,राहुल लोणारी, अतुल काथवटे,गणेश ठाकूर,सौरभ गडकर,दर्शन भिंगरकर, शुभम पवार, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर महाले,धनंजय नागपुरे, मयूर लकारे,श्रीकांत खंदारे,निलेश परदेशी,संतोष नागपुरे,धनराज पोकळे,यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने