विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे,उपाध्यक्ष हेमंत शाह,प्राचार्य तुषार कापसे,योगेश सोनवणे,राहुल नरोडे, मठाधिपती संत चरणदास महाराज उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत,ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत, पसायदाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
इ.8वीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. आराध्या कुमावत हिने *भारत मातेची* वेशभूषा धारण केलेली होती. श्रुती महाजन,सानवी कायस्थ,तनुश्री उपासे,दिशा लोणारी, वेदिका कवाडे,भूमिका राऊत,तनिष्का सोनवणे,परिणीती पावटेकर,या विद्यार्थ्यांनी *मिशन सिंदूर* यावर उत्कृष्ट नाट्य आणि नृत्य सादर केले.
नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतले. शार्वील शिरसाठ, अधिरा चव्हाण, देवांश सूर्यवंशी, यशस्वी धनवटे, इरा गायकवाड, वेधार्थ पटेल,रोहिनी जाधव,प्रतीक शिंदे, अथर्व वाघ,प्रज्ञेश कासार,रोनक राजपूत, ,वैभवी लाघवे ,नंदिनी डालकरी,ईश्वरी रासकर, कोमल शिंदे, आर्या जगदाळे, गीता कायस्थ, काव्या गायकवाड, नूतन दारुंटे, यांनी भाषण दिले.
मोक्षा वडे (युकेजी क्लास) *ही मायभूमी* हे डोळ्यांची पारणे फेडणारे नृत्य सादर केले.भाग्यश्री खानापुरे यांनी स्वातंत्र्यदिना विषयी माहिती सांगितली.
प्राचार्य तुषार कापसे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन माहिती सांगितली. अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे यांनी सर्व विद्यार्थी पालक उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आजचा दिवस हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व स्वातंत्र्यसैनिक,हुतात्मे यांना मानवंदना दिली. अशा प्रकारे स्वातंत्र्याचा इतिहास सर्वांच्या मनामध्ये कायमस्वरूपी टिकवुन ठेऊन राष्ट्र अभिमान बाळगणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, आपले सर्व सैनिक देशाच्या संरक्षणासाठी आपला जीव सुद्धा देत आहे, सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या जीवनात देशाच्या संरक्षणासाठी,विकासासाठी जडणघडणीसाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. आजच्या दिवशी इयत्ता आठवी मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवल्याबद्दल कुमारी श्रुती सुनील बोडके हिचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.