"हर घर तिरंगा" अभियानांतर्गत तिरंगा रॅली व मोटरसायकल रॅलीचे आयोजन

 येवला नगरपरिषदेतर्फे "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत तिरंगा रॅली व मोटरसायकल रॅलीचे आयोजन 



येवला │ ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत आणि "हर घर तिरंगा" या अभियानाच्या व्यापक प्रसारासाठी येवला नगरपरिषदेतर्फे आज भव्य तिरंगा रॅली व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.


रॅलीची सुरुवात नगरपरिषद कार्यालयासमोरून झाली. यामध्ये मुख्याधिकारी, श्री तुषार आहेर उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावने  कर व निरीक्षक श्री रोहित पगार स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे लेखाधिकारी तुषार नालकर आनंद महिरे आस्थापना प्रमुख श्री बाळू  आली. दीपक जावळे काकासाहेब क्षीरसाठ लेखाधिकारी किरण अहिरे राधेश्याम निकम शशिकांत मोरे राजेंद्र गंगापूरकर राजेंद्र निकम उदय परदेशी सुरेश गुंडाळे संजय गोसावी राजेंद्र लोंढे प्रवीण नागपुरे राजेंद्र जांभुळकर अशोक कसारे सोमनाथ भुरुख मयूर गोसावी गणेश गाडेकर राकेश गवते नितीन आहेर सुषमा विखे सरस्वती तुंबारे उज्वला अहिरे खैरुणीसा शेख कोमल कडतन वैशाली चव्हाण संध्या गवळी प्रियंका गाडेकर रेखा साबळे राजेश निकम राहुल जाधव प्रभाकर वाघ नितीन काळनं मच्छिंद्र पवार चेतन लोंढे वैभव जोर्वेकर कर्मचारी, ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे पर्यावरण दूत डॉक्टर योगेश जेजुरकर पर्यावरण दूत राहुल लोणारी सामाजिक कार्यकर्ते आनंद शिंदे मिननाथ  पवार विविध स्वयंसेवी संस्था तसेच शहरातील बचत गटातील महिला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


हाती तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीत शहरातील प्रमुख मार्गांवरून फेरी काढण्यात आली. मोटरसायकलस्वारांनी  तिरंगा ध्वजासह शिस्तबद्धपणे सहभाग घेत नागरिकांना देशभक्तीचा संदेश दिला.


मुख्याधिकारी यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी व नागरिकांचे आभार मानले व १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून देशभक्ती व्यक्त करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रकल्प अधिकारी श्री संदीप बोढरे यांनी उपस्थितांना तिरंगा ची शपथ दिली तर आभार प्रदर्शन गौरव चुंबळे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने