*" कर्मवीरांच्या परिसरुपी त्यागाला स्मरून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे सोने करावे...."
जनता विद्यालय,पाटोदा येथे समाजदिनी मान्यवरांचे. प्रतिपादन ....*
पाटोदा : मोहन कुंभारकर
येवला तालुक्यातील जनता विद्यालय पाटोदा येथे मराठा विद्या प्रसारक समाज या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस "समाजदिन " म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे ज्येष्ठ सभासद् , माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री . कारभारी पा.बोरनारे यांनी भूषवले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. एस. पाखले यांनी करून तत्कालीन सामाजिक परिस्थिती , शिक्षणाचे महत्व विशद करून संस्थेची पायाभरणी ते सद्यस्थिती सांगून कर्मवीरांचे कार्य हे दिपस्तंभाप्रमाणे असून त्या पवित्र कार्याचे आपण स्मरण ठेवले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे सर्व आद्यसंस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेच्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री.कारभारी पाटील बोरनारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील विदयार्थी कु. आराध्या म्हस्के, इकरा शहा, नाविन्य गाडे, कार्तिकी गायकवाड, दर्शना निकम यांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एस. एम. शेळके सर यांनी मनोगत व्यक्त करतांना "कर्मवीरांची शैक्षणिक तळमळ त्यांनी केलेला त्याग, साधी राहणी, उच्च विचारसरणी लक्षात ठेवून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भविष्य घडवावे " असे आवाहन केले. समाजदिनानिमित्ताने झालेल्या विविध शालेय मैदानी स्पर्धा तसेच रांगोळी व वकृत्व स्पर्धा यामधील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसं देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी कर्मवीरांना अभिवादन करण्यासाठी उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष मारुती घोरपडे, अभिनव बालविकासचे शालेय समिती प्रमूख तुकाराम बोराडे, माजी मुख्याध्यापक ए. बी. पाटील , पाटोदा गावाचे पोलीसपाटील मुज्जमिल चौधरी,अरुण गाजरे,कृष्णा शेटे,उत्तम शेटे , प्रवीण घोरपडे, दिनेश जगताप, अशोक पगारे,सचिन उगले, शिवराम बोरनारे, अण्णासाहेब दौंडे, संतोष आहेर, भगवान ठोंबरे, संदीप गायकवाड तसेच परिसरातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.एस.जी.बोरनारे,सांस्कृतिक समिती प्रमूख श्री. एस.डी.नवघिरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
सूत्रसंचालन श्री. पी. पी.भड यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. एन. व्हीं. गाडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.