स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्या इंटरनॅशनल स्कुल मध्ये उत्साहात कार्यक्रम संपन्न
येवला: येथील विद्या इंटरनॅशनल स्कुल मध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेश गुजराथी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिरुद्धभाई पटेल आणि शीला गुजराथी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश पटेल आणि संचालिका डॉ. संगीता पटेल यांची विशेष उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शुभांगी शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि प्रास्ताविक केले.
प्रमुख पाहुणे अनिरुद्ध पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगितले आणि देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी काय आहे, यावर जोर दिला. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाला स्मरून देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात शैलेश गुजराथी यांनी तरुणांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व विषद केले.
झेंडावंदन झाल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी एक सुरात महाराष्ट्र गीत, मा तुझे सलाम तसेच विद्यार्थ्यांनी बँड पथकावर सुंदर अशा कवायती सादर केल्या व आलेल्या पाहुण्यांनी सदर गोष्टीचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
या कार्यक्रमात निकुंज वडे, निरागा वाघ, तन्वीन कालडा, दक्षराज छाजेड, दिया हिरन यांनी विविध विषयावर उत्कृष्ट असे भाषणं करून पाहुण्यांची शाबासकी मिळवली. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी च्या विद्यार्थिनी रिचल ललवाणी व पालवी पवार यांनी केले.