येवला गणेश मार्केट मधील गाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टात अपिल दाखल......................

येवला गणेश मार्केट मधील गाळ्याधारकांचे सुप्रिम कोर्टात अपिल दाखल झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि येवला शहरात प्रथमदर्शनी भागात असलेले गणेश मार्केट विषयी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका १०९/२००३ दिपक पाटोदकर यांनी दाखल केलेली आहे. या याचीकेत येवला नगरपालिकेने केलेल्या अर्जावर दि.३० मार्च २०१२ ला आदेश देतांना येवला नगरपालिकेला सदरचे बांधकाम हटविण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिस खाते व जिल्हाधिकारी यांना संरक्षण आणि साधनसामुग्री आणि मनुष्यबळ पुरवण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे संबंधित गाळेधारकात संभ्रमाचे वातावरण होते. ४ आठवड्यात कार्यवाही करण्याचे आदेश असल्याने गाळेधारकांना आपली रोजीरोटीविषयी चिंता निर्माण झाली होती. या मा.उच्चन्यायालयाच्या आदेशावर दिल्ली येथील सुप्रिम कोर्टात अपिल दाखल झालेले असुन ३० एप्रिल २०१२ ला सदर अपिलाची सुनावणी होणार असल्याचे समजते. सदरचे अपिल अमृत बबनसा दाणेज व इतरांनी दाखल केलेले असल्याचेही समजते.

थोडे नवीन जरा जुने