येवला शहर भाजपा अध्यक्षपदी मनोज दिवटे यांची फेर निवड

येवला- येवला शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष मनोज दिवटे यांची फेर निवड करण्यात आले.
भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री विठ्ठल चाटे, निवडणूक निरीक्षक नितीन पांडे, मोहनलाल शर्मा, भूषण कासलीवाल, जिल्हा सरचिटणीस शंकरराव वाघ, विलासदादा ढोमसे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजपा अध्यक्षपदाची त्रैवार्षिक निवडणूक झाली. यावेळी भाजपा नेते धनंजय कुलकर्णी यांनी अध्यक्षपदासाठी दिवटे यांच्या नावाची सूचना मांडली. रमेश भावसार यांनी त्यास अनुमोदन दिल्याने दिवटे यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली.भाजपा ज्येष्ठ नगरसेवक बंडू क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी यांची प्रसंगोचित भाषणे झाली. प्रास्ताविक निवडणूक निरीक्षक पांडे यांनी, तर सूत्रसंचालन बापू गाडेकर यांनी केले.
निवडणूक प्रसंगी नगरसेवक सुनील काबरा, नगरसेवक सौ. बिंगाबाई पेटकर, भानुदास गायकवाड, नारायण क्षीरसागर, श्यामसुंदर काबरा, विजय बाकळे, संजय कुक्कर, पंकल पहिलवान, नितीन शेळके, श्रीराम लक्कडकोट, किरण वडे, जितेंद्र पहिलवान, भावडूसा कंकरेज, भगवान गाडेकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने