कोटमगाव (खुर्द) येथील जगदंबा देवस्थान ट्रस्टच्या बैठकीत सुरक्षाविषयक ठरावांना मंजुरी

येवला- कोटमगाव (खुर्द) येथील श्री जगदंबा देवस्थान ट्रस्टची बैठक आज सकाळी देवस्थानचे अध्यक्ष यादव तुकाराम कोटमे (गुरुजी) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात बोलविण्यात आली होती.
या बैठकीत जगदंबा माता मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणाची गंभीर दखल घेत मंदिराच्या सुरक्षितेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करण्याचा ठराव करण्यात आला, तसेच मंदिरात 16 हायसिक्युरिटी कॅमेरे व देवीच्या मुख्य गाभार्‍यात हायमोशन सेंसर सिस्टिम बसविण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. मंदिरात चोरी करण्यासाठी ज्या खिडकीतून चोरटय़ाने ग्रील कापून प्रवेश केला, त्या खिडकीचे सर्व गिल्र जाळी बदलून नवीन मजबूत ग्रील बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापक राजेंद्र कोटमे यांनी दिली. बैठकीस देवस्थानचे विश्वस्त रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने, माधवराव धांद्रे, रामचंद्र लहरे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने