येवल्यात 21 फेब्रुवारीला एकात्मतादिन

येवला   - तालुका पेन्शनर्स असो.च्या वतीने सेवानिवृत्त सेवक एकात्मतादिन व तालुका मेळावा 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती सभागृहात होत आहे. माजी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पवार, गटविकास अधिकारी अजय जोशी, गटशिक्षणाधिकारी चौधरी, जिल्हा संघटना अध्यक्ष माधवराव भडांगे, सचिव भास्कर देशपांडे आदींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष बी. पी. थोरात, सचिव के. के. शिंदे यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने