येवला -(अविनाश पाटील शिंदे) - येवला तालुक्यात शासनाच्या कृषी विभागाच्या सूक्ष्म ठिबक सिंचन व तृषार सिंचन योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न मनसेच्या सतर्क पदाधिकाऱ्यांमुळे उघडकीस आला आहे. येवला तालुक्यातील कुसमाडी येथील बापू वामन गायकवाड यांच्याकडे कृषी सहायक कातोरे हे दि .२० मार्च रोजी आले त्यांनी गायकवाड यांना आपण तृषार सिंचन संच तपासण्यासाठी आलो आहोत असे सांगीतल्यावर गायकवाड गोधंळुन गेले आपण कुठलाही तृषार सिंचन संच घेतला नसल्याचे त्यांनी सांगीतले. कृषी सहायक कातोरे यांनी गायकवाड यांना सांगीतले आपण आनंद हार्डवेअर्स येवला यांचेकडून तृषार संच घेतला असून त्याचे शासनाकडून मिळणारे अनुदान प्राप्त करण्यासाठीचा प्रस्ताव या विक्रेत्याकडून तुमच्या सही व कागदपत्रासह दाखल असल्याने आपण तो संच तपासणीसाठी आलो होतो असे सांगीतले. त्यामुळे गायकवाड यांनी येवला तालुका कृषी खात्यात पर्यवेक्षक मोजगुडे व तालुका कृषी अधिकारी कुळधर यांच्या कडे संपर्क साधला . तेथे त्यांनी संबंधीत प्रस्ताव पाहीला व त्यावरील सही आपली नाही तसेच त्या प्रस्तावासोबतचे कागदपत्रे आपण दिली नाहीत असे सांगीतले. तसे पाहता येवला तालुका कृषी अधिकारी यांनी याबाबत गुन्हा दाखल करणे गरजेचे असताना त्यांची भूमिका संशयास्पद वाटल्याने स्वतः गायकवाड हे कायदा पदवीधर असल्याने त्यांनी याबाबत चौकशी सुरु ठेवली. याबाबत त्यांनी असे ही सांगीतले कि शासनाच्या योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कृषी अधिकारी यांच्या संगनमताने असे अनेक प्रकरणे दाखल झाल्याचा संशय आहे. तसेच प्रस्तावासोबतच्या कागदपत्रावरील सरकारी अधिकारी यांचे सही शिक्के यांची सत्यता पडताळणे गरजेचे आहे.
या प्रकरणात आनंद हार्डवेअर चे संचालक तानाजी आंधळे यांचे व कृषी खाते यांचे संगनमताने अनेक प्रकरणे घडल्याचा संशय आहे. दि . २३ मार्च रोजी येवला शहर पोलिसांनी याबाबत तानाजी आंधळे या विक्रेत्यावर गुन्हा ४४/२०१३ भादवि 420,463,464 34 या कलमांतर्गत दाखल केला आहे.पुढील तपास पोलिसपथकाकडून सुरु असून संबंधीत विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.