येवला - येवला शहरातील मकरसंक्रातीनंतर जोरात असणारा पारंपारिक सण म्हणजे रंगपंचमी. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शहरात रंगपंचमी ही कोरडी साजरी करण्याचा निर्णय उत्सव संमितीने घेतला आहे. येवल्यातली रंगपंचमी अत्यंत उत्साहाने साजरी करण्याचा नागरिकांची शेकडो वर्षाची पंरपरा या वर्षी कोरडी राहणार आहे. पंतगोत्सावाप्रमाणे बाहेरगावी असलेले येवलेकर या सणाला येवल्यात येत असत. याबाबत अधिक माहिती देताना उत्सव समितीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी यांनी सांगीतले कि पाण्याचे वाढती टंचाई लक्षात घेता या वर्षी फक्त रंगाचा टिळा लावून रंगपंचमी चा सण साजरा करण्याचे मंडळानी ठरविले आहे. ज्या मंडळाना पाणी वापरायचे आहे त्यांनी पुर्नविचार करावा व ते पाणी गोशाळा किंवा येवल्याच्या पुर्व भागातील वन्यप्राण्याच्या पिण्यासाठी द्यावे असेही त्यांनी आवाहन केले. येवल्यातील समाजसेवक प्रभाकर झळके यांनी ही लोणारी यांच्या प्रस्तावाला दुजोरा दिला असून पंरपरेपेक्षा परिस्थिती चा विचार करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.
दुष्काळामुळे येवला शहरातील पारंपारिक रंगपंचमी बिनापाण्याची साजरी होणार
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0