येवला नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी

येवला - येवले नगरपालिकेचया पं. जवाहरलाल नेहरू सभागृहात नीलेशभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखली नगरपरिषदेच्या सन २0१३- १४ या आर्थिक वर्षाच्या २0 कोटी २४ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.

नागरी सुविधांसह त्यात विविध महत्वाच्या भांडवली स्वरूपाच्या योजनांसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. शहरातील रस्ते, पाणी, आरोग्य, साफससफाई या मुलभूत परंतु महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्या दृष्टीकोनातुन या तरतुदी करण्यात आल्या आहे.

दुसर्‍या सर्वसाधारण सभेमध्ये सन २0१३-१४ साठी लागणारी जंतुनाशके, स्ट्रीटलाईट, वाहने दुरूस्ती व इतर दैनंदिन साहित्य खरेदीसाठी निविदा मागविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एकूण २६ विषयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यात दैनंदिनी छपाई, संगणक देखभाल-दुरूस्ती, कर्मचारी गणवेश, कामगारांना गमबुट चप्पला देणे, वाहनांची दुरूस्ती, जंतुनाशकांची फवारणी, सन २0१३-१४ साठी पथदिप व उर्जा बचत करणार्‍या दिव्यांची देखभाल दुरूस्ती, शहरात व कॉलनी भागात स्ट्रीटलाईट पोल, जन्ममृत्युच्या मोडी लिपीतील नोंदींचे मराठीत रूपांतर करणे, फॅक्समशीन व कॅमेरा खरेदी, सुजल निर्मल अभियांना अंतर्गत पाणी व उर्जा लेखापरिक्षणाच्या कामास मुदतवाढ अश्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.

लोकवर्गणीपोटी सर्व नगरसेवकांनी प्रत्येकी रू.८0,000/- (अक्षरी रूपये एशी हजार) देण्यास संमती दर्शविलेली आहे. त्यामुळे रू.२0,00,000/- (अक्षरी रूपये वीस लाख) पाणी पुरवठा योजनेसाठी लोकवर्णणी जमा झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. सभेत उपनगराध्यक्षा भारती जगताप यांच्यासह २२ नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी सभागृहात विविध विषयांवर मार्गदर्शन केले. नीलेश पटेल व सुनील काबरा यांनी एक पाण्याचा टँकर पालिकेस भेट दिला.
थोडे नवीन जरा जुने