यवला
तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजप्रश्नी पंचायत समिती सदस्य
संभाजी पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येवला तहसीलदार हरिष सोनार
यांना दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, शासकीय योजनांचा लाभ
मिळविताना राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडणे आवश्यक असल्याने बँकांच्या
असहकार्यामुळे, दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होत आहे.
रेशनकार्ड, घरगुती गॅस यासाठी खाते उघडण्यास या बँकांकडून नकार दिला जातो.
मंजूर प्रकरणे संबंधित कार्यालयास परत केली जात नाही, वैयक्तिक खाते
उघडण्यास पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लावला जातो. याप्रकरणी तातडीने
सर्व संबंधितांना सूचना करून कामकाजात सुधारणा न झाल्यास येत्या २८
मार्चपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही
पवार यांनी दिला आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजप्रश्नी आंदोलनाचा इशारा
byअविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे
-
0