येवला तालुकास्तरीय प्रशासकीय संकुल देखरेख समितीची बैठक............

येवला : तालुकास्तरीय प्रशासकीय संकुल देखरेख समितीची बैठक प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सभागृहात झाली.
बैठकीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारास संरक्षक भिंत, पूर्णवेळ सुरक्षा रक्षक असण्याची गरज स्पष्ट केल्या गेली.
परिसरातील लॉन, बागेचा देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच परिसर स्वच्छतेसाठी बचतगट नियुक्त करून या कामासाठी शासकीय निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रस्ताव सादर करण्याची सूचना प्रांताधिकारी सुलाने यांनी यावेळी केली. वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच एजन्सी नियुक्त करून पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. असे बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. बी.पाटील यांनी याविषयावरील चर्चेप्रसंगी सांगितले. मुद्रांकविक्रेत्यांच्या मासिक भाड्यात वाढ करण्याचा व पथदीप दुरुस्तीचा निर्णयही यावेळी घेण्यात अला. बैठकीस तहसीलदार हरीष सोनार, जिल्हा परिषदेचे उपअभियंता व्ही.बी. वाईकर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता एम.बी. क्षीरसागर, एस.एस. भामरे, उपकोषागार अधिकारी आर.एन. अहेर, पंचायत समितीचे डि.एल. अलकुंटे, दुय्यम निबंधक कार्यालयाचे पी.एस. गांगोडे, भूमि अभिलेख उपअधीक्षक पी.व्ही. गामणे आदि उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने