मायबोली कर्णबधीर विद्यालय वंचीतासाठी ओएसीस - सुमेरकुमार काले विक्रीकर आयुक्त नाशिक विभाग

येवला- (अविनाश पाटील) दिवसेदिवस जगाचे व्यवहार नाते आणि एकुणच संवाद
निकट येत असून बदलाचा वेग फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे सर्वत्र जणू
स्पर्धेचे युग अवतरत असताना समता प्रतिष्ठाण ही संस्था जाणिवांच्या
प्रगल्भतेने कर्ण बधीर असलेल्या विशेष मुलांसाठी मायबोली निवासी कर्णबधीर
विद्यालय चालवित आहे. मायबोलीतील या विशेष मुलांना शिक्षणाबरोबर
स्वावलंबनाचे धडे शिकविणारी ही शाळा तमाम विशेष मुलांसाठी ओएसीस असल्याचे
गौरवोद्गार नाशिक विभागाचे विक्रीकर आयुक्त श्री.सुमेरकुमार काले यांनी
येवला येथील समता प्रतिष्ठाण संचलित मायबोली निवासी कर्णबधीर विद्यालयात
जागतिक अपंग दिन सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी तहसीलदार हरिष सोनार हे होते.
ज्यांचा कुटुंबापासून समाजापर्यंत सर्वच जण दुस्वास करतात दुर्लक्ष करतात
त्यांना समता प्रतिष्ठाण ही संस्था आयुष्यात उभे करण्यासाठी जे अथ्थक
परिश्रम घेत आहे त्यास मी सर्वप्रथम सलाम करतो हे काम कुणीही करत नसते
त्यासाठी झोकून देणेची तयारी लागते, झपाटल्याशिवाय या कार्यात अपेक्षीत
यश येत नाही. या कर्णबधीर मुलांच्या शिक्षण व प्रशिक्षणाबरोबर त्यांच्या
पुर्नवसनाचा ध्यास संस्थेने घेतलेला आहे. या कामात अनेकजण त्रास देतात पण
त्रास देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे या समाजाने संत तुकाराम व संत
ज्ञानेश्वरांना त्रास दिल्याचा इतिहास आहे. समाजातील गोरगरिब
विद्यार्थांचे शिक्षणासाठी प्रतिष्ठाणचे पदाधिकारी देत असलेले योगदान
विशेष उल्लेखनीय असल्याचे तहसीलदार हरिष सोनार यांनी या प्रसंगी नमुद
केले. नगराध्यक्ष निलेश पटेल , भास्कर कोल्हे,महेंद्र काले आदींचीही
भाषणे यावेळी झाली. नाशिक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अरुणा
सादिक जाफर यांनी ही विशेष शाळा खऱ्या अर्थाने मानवेतेचे मंदिर उभे करीत
असून या शाळेत येऊन आपण खुप समाधानी होऊन जात आहोत असे मत व्यक्त
केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे
यांनी करुन मान्यवरांचे स्वागत केले व शाळेच्या १८ वर्षातील कारकिर्दीचा
आढावा मांडला. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर व सावित्रीबाई फुले
यांच्या प्रतिमेस सुमेरकुमार काले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन
करण्यात आली. विद्यालयातील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक
कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. ओकांर स्वरुपी सदगुरु
समर्था व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर नाटिका सादर करण्यात आली . या
प्रसंगी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते सादिक जाफर, रामेश्वर कलंत्री,
वैजापूरचे बापूसाहेब वाणी, घनश्याम वाणी , विष्णुपंत शिनगर, बंडू
क्षिरसागर, प्रितीबाला पटेल, रावसाहेब दाभाडे, प्रा.एस.व्ही निकुंभ, माधव
देशपांडे,सुनंदाताई कोल्हे, यास्मिन शेख, मुख्याध्यापक आर.डी पाटील,
पंडीत मढवई , डॉ.वाकचौरे, एड. बापू गायकवाड, भाउसाहेब जगताप , अरुण
कोकाटे आदींसह मोठ्या संख्नेने नागरिक उपस्थित होते.सुत्रसंचालन
बाबासाहेब कोकाटे यांनी केले आभार दिनकर दाणे यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने