गटशिक्षणाधिकारी दालनात विद्यार्थ्यांची भरली शाळा

येवला - जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर एका
शिक्षकावर भारम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे भवितव्य अवलंबून
असताना गुरुजींसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले; मात्र आजपावेतो
शिक्षण विभागाला जाग न आल्याने भारमचे ग्रामस्थ, पालक व सरपंचांनी
विद्यार्थ्यांना मंगळवारी चक्क पंचायत पंचायत समिती कार्यालयात आणून
गटशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनातच शाळा भरवली.

भारमचे सरपंच सुनंदा जेजुरकर, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष
कृष्णा जेजुरकर, उपाध्यक्ष मुकुंद जोशी, सदस्य संतोष बागुल, ग्रामपंचायत
सदस्य शिवाजी शिंदे, आप्पा देशमुख, रामदास पगारे, राहुल पगारे, संदीप
थोरात, लहानू शिंदे, मंगेश गांगुर्डे, संतोष उपाध्ये, लक्ष्मण देशमुख,
सूर्यभान दवंगे, ज्ञानेश्वर थोरात, संजय अभंग, नितीन व्यवहारे, नितीत
थोरात आदींसह ग्रामस्थ, पालक जिल्हा परिषद शाळेतील 74
विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन पंचायत समितीत आले. सकाळी 10.30 वाजता
विद्यार्थ्यांना बघून पंचायत समिती कार्यालयाला शाळेचे स्वरूप आले होते.
गटशिक्षणाधिकारी किसनराव चौधरी यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा
भरली. तीन शिक्षक देण्यासाठी ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन
दिले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने