मत्सव्यवसायाने मिळाला रोजगार

येवला - मागील वर्षी पडलेल्या भिषण दुष्काळाला इष्टापत्ती
समजून कोरडे पडलेल्या पाझर तलावातील गाळ राजापुर गटातील जि.प.सदस्य प्रविण
गायकवाड यांनी तालुक्यातील पुर्व भागातील शेतकऱ्यांना गाळ काढून नेण्याचे
आवाहन केले . त्याला प्रतिसाद मिळाल्याने हजारो टन गाळ काढला गेल्याने पाझर
तलावांची खोली वाढली. जमिन ही गाळाने सुपिक झाली. पर्जन्यराजाने केलेल्या
कृपादृष्टीने या भागातील पाझर तलाव ओसंडून वाहू लागले. गाळामुळे सुपिकता, तसेच
वाढलेल्या खोलीमुळे भुजलाचे स्तर सुधारला या दुहेरी फायद्याबरोबरच प्रविण
गायकवाड यांनी कल्पकतेने ५ महिन्यांपुर्वी या पाणी साठ्यात पालकमंत्री छगन
भुजबळ व तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते मत्सबीज सोडले. त्यामुळे या भागातून
रोजीरोटीसाठी उसतोडीसाठी जाणारे आदिवासी मजूरांना रोजगार मिळाला. त्यामुळे
त्यांचे स्थलांतर थांबले

यापुर्वीही अंगुलगाव येथे सौरपथदिप बसवीणाऱ्या प्रविण गायकवाड यांनी या
तलावांना राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई
या महान महिलांची नावे दिली आहेत. आज या पाझर तलावातून माश्यांचे मोठ्या
प्रमाणात उत्पादन मिळत असून येवला तालुक्याच्या पुर्व भागातील देवदरी,
अंगुलगाव,रेंडाळा,न्याहारखेडे, डोंगरगाव, ममदापुर या गावातील आदिवासींना
चांगले रोजगाराचे साधन लाभले आहे. राजापूर गटातील दहा पाझर तलावातून सध्या
कोंबडा,कतला,मिरगल यासह गावरान मुऱ्या,गिरी जातीची प्रतिदिन दहा क्विंटल मासे
उत्पादन मिळत असुन नांदगाव,वैजापूर,कोपरगांव आदि ठिकाणाहुन व्यापारी जागेवरच
करेदीला येत आहे. या माशांना प्रतिकिलो १२५ ते १५० रुपये बाजारभाव मिळत आहे.

प्रविण गायकवाड (जि.प सदस्य राजापुर गट ) यांचे मनोगत -
मागील वर्षी पडलेल्या दुष्काळात मोठे पाझर तलाव कोरडे झाले. आजपर्यंत कधीही न
दिसणारा गाळ दिसू लागला . हा गाळ जमिनींना सुपिक बनवेल हीच कल्पना घेऊन घरोघरी
शेतकऱ्यांना भेटून प्रबोधन केले. प्रथम अल्प प्रतिसाद मिळाला नंतर शेतकऱ्यांनी
चांगला प्रतिसाद दिला. त्यातच महात्मा फुले जलसंसाधरण योजनेच्या चे साथीने हे
प्रमाण वाढले. पाउसाच्या कृपेने जुनच्या पहिल्या पंधरवड्यातच तलाव भरले.
त्यामुळे आपले दरवर्षी स्थलांतरीत होणारे आदिवासी बांधवाना मत्सपालनाचा
व्यवसाय या तलावात करता येईल अशी कल्पना सुचली . तात्काळ तीची अंमलबजावणी केली
त्यासाठी पालकमंत्र्याचेही मार्गदर्शन मिळाले. या तलावांना महान स्रीयांचेनावे
देण्यात आली असून नाविन्यपुर्वक कल्पना राबवून आदिवासी बांधवाचे जीवनमान
उंचावण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने