अपंगाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये मायबोलीच्या वैशाली पवार ला सुवर्णपदक

येवला (अविनाश पाटील) - अपंगाच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये
येवला शहरातील मायबोली कर्णबधीर विद्यालयाच्या वैशाली पवार या
विद्यार्थीनीने सुवर्णपदक पटकावले. अमरावती येथे ३ जानेवारी ते ५
जानेवारी ला पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये लांब उडी या क्रिडा प्रकारत
तिचा प्रथम क्रमांक आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
सहायता विभाग, अपंग कल्याण व क्रिडा संचालनालय, पुणे यांच्या विद्यमाने
या क्रिडा स्पर्धा अमरावती येथे संपन्न झाल्या. जिल्हा क्रिडा स्पर्धेत
प्रथम क्रमांक मिळवणारे स्पर्धक यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे
वैशाली पवार ही अडाणी व गरीब आदिवासी कुटुंबातील कर्णबधीर विद्यार्थीनी
आहे. राजापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रविण गायकवाड यांनी जिल्हा
परिषदेच्या शिक्षण समिती बैठकीमध्ये तिच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करुन
अभिनंदन केले. समता प्रतिष्ठान संचलित मायबोली कर्णबधीर विद्यालयाचे अनेक
विद्यार्थी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. वैशाली पवार चे
संस्थेचे संस्थापक अर्जुन कोकाटे, नगराध्यक्ष निलेश पटेल, मुख्याधिकारी
डॉ.दिलीप मेनकर, मारोतराव पवार आदिसंह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे,हेमंत पाटील, मंदा पडोळ, सुकदेव आहेर,
संतोष कोकाटे, रेखा दुनबळे,नितीन कदम यांनी तीला मार्गदर्शन केले.
थोडे नवीन जरा जुने