येवला अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा

येवला (अविनाश पाटील) - 'बालके कुपोषित, आम्ही उपाशी', 'मानधन नको,
वेतनर्शेणी द्या', 'भाऊबीज नको, बोनस द्या', 'कोण म्हणतो देणार नाही.
घेतल्याशिवाय राहणार नाही', अशा घोषणा देत येवला तालुक्यातील
अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी येवला तहसील व पंचायत समितीवर मोर्चा नेऊन
धडक दिली.

अंगणवाडी कर्मचारी सभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत साबरे यांच्या
नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी 1 वाजता हुतात्मा स्मारक येथून घोषणा देत हा
मोर्चा नेण्यात आला. नायब तहसीलदार शंकरराव झाल्टे यांना निवेदन देण्यात
आले. यानंतर पं.स. कार्यालयावर मोर्चा नेला. प्रकल्प कार्यालयासमोर घोषणा
देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रकल्प अधिकारी के. एम. बागुल व उमेश
राजपूत यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी रा.कॉँ.च्या माया परदेशी, उषा
रक्ताटे, शीतल शेटे, मीनाक्षी पैठणकर यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने