वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या पादुकांची येवल्यात मिरवणूक

येवला - (अविनाश पाटील) श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज
यांच्या समाधी शताब्दीनिमित्त श्रीक्षेत्र माणगाव येथून निघालेल्या पालखी
रथयात्रा रविवारी शहरात दाखल झाली. कोपरगाव येथून आलेल्या या पालखी
रथयात्रेचे स्वागत गंगादरवाजा भागातील महादेव मंदिराजवळ सकाळी 9 वाजता
फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले. डॉ. रमेश व रश्मी तगारे यांनी
सपत्निक पालखीचे पूजन केले, तर श्रीक्षेत्र दत्तधाम, परभणी येथील
मठाधिपती मकरंद महाराज यांचे स्वागत उमेश पटेल यांनी केले. यानंतर
हलकीच्या निनादात व ढोलताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
नगर-मनमाड राज्यमार्गावरील कन्यादान लॉन्सवर रथयात्रेची सांगता झाली.
मिरवणुकीत भजनी मंडळ सहभागी झाले होते. दरम्यान, मकरंद महाराज यांचे या
वेळी टेंबे स्वामींच्या जीवनचरित्रावर प्रवचन झाले.
थोडे नवीन जरा जुने