माणसाने कसे वागावे हे ग्रंथच शिकवतात - कवी खलील मोमीन

येवला (अविनाश पाटील)- वाचनामुळे माणुस घडतो.रिकाम्या वेळात इडियट बॉक्स
पुढे बसण्यापेक्षा पुस्तकांचे वाचन करा.वाचनामुळे आपल्या
जीवनशैली,वागण्यात नक्कीच बदल होतो. माणसाने कसे वागावे हे ग्रंथच
शिकवतात असे प्रतिपादन प्रसिध्द कवी खलील मोमीन यांनी केले.रविवारी पार
पडलेल्या विभागीय ग्रंथालय संघाच्या १५ व्या तर नाशिक जिल्हा ग्रंथालय
संघाच्या ४३ व्या अधिवेशनात ते बोलत होते.
राजकिय मंडळीनी आपल्या फायद्यासाठी प्रांतवाद निर्माण केले असुन
सामान्यांची यामुळे फरफट झाली असेही यावेळी ते म्हणाले . राजकिय विडंबन
करताना त्यांनी "क्या फरक पडता है" ही कविता सादर केली तर ग्रामीण
भागातील माहेरवाशीन व शेतकरी यांचे वर्णन करताना त्यांची 'गावाची आठवण'
ही कविता सर्वांनाच भावली.अधिवेशनाचे उद्घाटन औरंगाबादचे सुप्रसिध्द कवी
तथा जनशांती वाचक चळवळीचे प्रणेते श्रीकांत उमरीकर यांचे हस्ते करण्यात
आले.साहित्य संमेलनात ग्रंथालय चळवळीला स्थान नसते याची खंत त्यांनी
व्यक्त केली. येवला तालुक्यातील छोट्याशा गावात झालेले हे संमेलन
आगळेवगेळे झाले. ढोलताशा व लेझीमच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात
आली.यावेळी विविध पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माणिकराव
शिंदे,पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पवार,माजी नगराध्यक्ष पंकज
पारख,जि.प सदस्य बाळासेह गुंड,सहायक ग्रंथालय संचालक अविनाश येवले,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुरज मडावी,गटविकास अधिकारी अजय जोशी,
प्रा.डॉ.भाउसाहेब गमे, माजी पंचायत समिती सभापती संभाजी पवार, कंचनसुधा
एकॅडेमीचे अजय जैन,चंद्रकांत साबरे, एड.समिर देशमुख,सरपंच संगीता पवार
प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष
बाबासाहेब शिंदे यांनी केले.प्रमुख पाहुण्याचा परिचय अर्जुन कोकाटे यांनी
करुन दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबासाहेब शिंदे, सुकदेव मढवई,भाउसाहेब
रोकडे,गोरख खाराटे,रंगनाथ गुंजाळ,प्रदिप पाटील आदिंनी प्रयत्न केले.
सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी तर राजेंद्र घोटेकर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने