येवल्यातील पाणी प्रश्नी पुण्यात आंदोलन...जल हक्क समितीचा संघर्ष सुरू

येवला -(अविनाश पाटील) - तालुक्यातील जलहक्क संघर्ष समिती ने आत्म क्लेश
आंदोलन सुरू केले आहे . समितीचे प्रतिनिधी म्हणून भागवत सोनवणे यांनी लघु
सिंचन (जलसंधारण) महाराष्ट्र प्रदेश कार्यालय , येरवडा पुणे येथे
कार्यालयाचे आवारात उपोषण ,सार्थ ज्ञानेश्वरी पारायण सुरू केले आहे.
ममदापुर येथील मेळाच्या बंधारा प्रश्नी जल हक्क संघर्ष समितीने हे आंदोलन
केले आहे. आज दिवस भरात मुख्य अभियंत्यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र
प्रस्तावा वर सही न केल्यास उदया निषेध म्हणून अर्धे मुंडन केले जाणार
आहे. असे भागवत सोनवणे यांनी सांगीतले.
सदर कार्यालया कडून पाणी उपलब्धता प्रमाण पत्र मिळणे कामी अक्षम्य
दिरंगाई केली आहे . केवळ एका सही साठी १५ दिवस दररोज पाठपुरावा करून ही
पुर्तता करणेत आलेली नाही. सदर कामी एक एक दिवस महत्वाचा असून लोकसभा
निवडणुकीची आचार संहिता सुरू होण्या अगोदर पाणी उपलब्धता प्रमाण पत्र,
सविस्तर प्रकल्प अहवाल आणि प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे. गेली १४
वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून यासाठी केलेल्या विविध आंदोलना मुळे हा
प्रश्न नाशिकचे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छगन
भुजबळ साहेब, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे साहेब यांचे आदेशानुसार तापी
महामंडळाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठीचा ना हरकत दाखला देवून ५ महिने
कालावधी झाला असून पुणे येथील प्रदेश कार्यालयात प्रस्ताव केवळ एका
सहीसाठी गेली १५ दिवस पडून आहे. याच कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या
नाशिक मंडल कार्यालयाने नुसता प्रस्ताव सादर करणेसाठी ५ महिने दिरंगाई
केली आहे. संबधीताकडून कायमच दिरंगाई होत असते. निव्वळ आौपचारिकता असलेला
पत्रव्यव्यवहार हे कार्यालय वेळेत पुर्ण करत नाही.त्यामुळे सदर
कार्यालयाला दिरंगाई ला जबाबदार धरून त्यांचे कडून वरील प्रकल्पाच्या
पुर्णत्वासाठी कालबद्ध लेखी कार्यक्रम जाहीर होत नाही तो पर्यंत हे
आंदोलन मागे घेतले जाणार नाही. असेही भागवत सोनवणे यांनी सांगीतले.
थोडे नवीन जरा जुने