अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचीताचा येवला तहसील कार्यालयावर मोर्चा

येवला - (अविनाश पाटील) अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून
हेतूपुरस्कररीत्या वंचीत केल्याचा आरोप करुन येवल्यातील आम आदमी पार्टीने
येवला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. देवीचा खुंटावरून या मोर्चाची
सुरुवात झाली शहरातून तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.
मोर्च्याचे नेतृत्व मेहमुद शेख बाबू यांनी केले.
शहरातील मोमिनपुरा भागातील रेशनदुकानदाराने या योजनेच्या लाभापासून वंचीत
ठेवल्याचा आरोप नागरिंकानी केला आहे. या दुकानदाराच्या यादीत गरीबांची
नावे नसून त्याच्या मर्जीतील निवडक श्रीमंताची नावे असल्याचा आरोप
त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आपली नावे अन्न
सुरक्षा योजनेच्या यादीत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या
रेशनदुकानदाराकडुन वेळेवर शिधा मिळत नाही, दुकान बंद असते अशीही तक्रार
त्यांनी केली आहे. नायब तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर मेहमुद शेख,
अशपाक शेख,अख्तर हाफिज,साजीद खान,सलिम शमशुद्दीन,वसीम चाँदसाब, शेख
इम्रान इक्बाल,अजिज रज्जाक, असिफ शे.ईस्माईल,अरिफ मो.अक्रम, मोबीन
खान,सलिम कुरेशी आदींसह नागरिकांच्या सह्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने