प्रशिक्षण शिबिरास येवला पंचायत समिती सभापतींची अचानक भेट ..... शिक्षकांची गैरहजेरी

येवला (अविनाश पाटील)
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना
कशा प्रकारे शिक्षण द्यावे, हे शिकवण्यासाठी शिक्षकांना देण्यात
येणार्‍या प्रशिक्षण शिबिरास काही शिक्षक बिनधास्तपणे दांडी मारत
असल्याचे निदर्शनास आले. या शिबिराच्या वेळेत येवला पंचायत समितीच्या
सभापती शिवांगी पवार आणि गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी बुधवारी अचानक
भेट दिली, त्यावेळी सत्य परिस्थिती लक्षात आली. या शिबिरास अपेक्षित
शिक्षक गैरजहर होते, तर काही शिक्षक शिबिर सोडून बाहेर येऊन गप्पा
मारताना आढळून आले.
तालुक्यातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अपंग विद्यार्थी आहेत,
तेथील शिक्षकांसाठी शहरातील कालिका प्राथमिक विद्यामंदिरात सोमवारपासून
तीनदिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरास 170 शिक्षकांनी येण्याची
अपेक्षा असताना, पहिल्या दिवशी 147, दुसर्‍या दिवशी 141, तर तिसर्‍या
दिवशी 140 शिक्षकांची हजेरी होती. यामध्ये तीन शिक्षक सह्या करून
शिबिरातून निघून गेल्याचे आढळले, तर आठ शिक्षक बाहेरील आवारात गप्पा मारत
असल्याचे आढळले.
दुसरीकडे, वर्गात जे शिक्षक बसले होते, ते केवळ र्शवणभक्ती करत होते.
यामध्ये तुम्ही काय शिकलात, असा सवाल सभापती पवार यांनी केला असता, हे
सर्व शिक्षक निरुत्तर झाले. या घटनेनंतर पवार यांनी गटशिक्षणाधिकारी किसन
चौधरी यांच्याशी संपर्क साधत प्रशिक्षणस्थळी हजर राहण्यास सांगितले.
याबाबत अजय जोशींनी नाराजी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने