येवला नगरपरिषदेची सन २०१४ या सालातील दैनंदिन कामकाज डायरीचे प्रकाशन

येवला- (अविनाश पाटील) - येवला नगरपरिषदेची सन २०१४ या सालातील दैनंदिन
कामकाज डायरीचे प्रकाशन शनिवार १५ फेब्रुवारीला मा.ना.छगनरावजी भुजबळ
यांचे हस्ते संपर्क कार्यालयात नगराध्यक्ष निलेश पटेल,मुख्याधिकारी
डॉ.दिलीप मेनकर,गटनेते प्रदिप सोनवणे, उपनगराध्यक्षा भारती जगताप यांचे
उपस्थितीमध्ये झाले. ना.भुजबळांच्या साह्याने येवला नगरपालिकेमार्फत
झालेल्या विविध विकास कामाच्या छायाचित्रासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारीसह
सर्व नगरपालिका विभागप्रमुखाच्या दुरध्वनी संपर्क क्रमांकाचा यात समावेश
आहे. नगरपालिकेची नविन इमारत, शहरातील सध्या चालू असलेलेव्यापारी
संकुले,महात्मा फुले नाट्यगृह,अग्निशमन केंद्र,वाढीव पाणीपुरवठा योजना या
सह अनेक विकासकामांची छायाचित्रे यात समाविष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने