येवला येथे फत्तेबुरुज नाक्यावर मोबाइलच्या दुकानात चोरी

येवला - शहरातील फत्तेबुरुज नाक्याजवळील ज्ञानेश्वर खैरमाडे यांच्या
मोबाइल विक्री व दुरुस्तीच्या दुकानातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास
अज्ञात चोरट्यांनी संगणक, कार टीव्ही, मोबाइल अँक्सेसरीज, बॅटरीज,
चार्र्जस, कव्हर्स, स्पेअर्स आदींसह दुरुस्तीस आलेले पाच मोबाइल
हॅण्डसेट्स असा सुमारे 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. फत्तेबुरुज येथील
जंगलीदास माउली तपोभूमी प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दुकानातून मंगळवारी
मध्यरात्री चोरट्यांनी 34 हजार रुपयांच्या विविध वस्तू चोरून नेल्याची
तक्रार ज्ञानेश्वर खैरमाडे यांनी येवला शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. चोरी
गेलेल्या वस्तूंमध्ये सुमारे 12 हजार रुपयांचा एक एलसीडी, संगणक, कार
टीव्ही, 14 हजार रुपये किमतीच्या मोबाइल अँक्सेसरीजसह आठ हजाराचे मोबाइल
व कागदपत्रे यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने