विकास कशाला म्हणतात हे खोटे बोलणार्‍यांना काय कळणार

येवला तालुक्यात विकासकामांचे उद्घाटन

विकास कशाला म्हणतात हे खोटे बोलणार्‍यांना काय कळणार, झालेली विकासकामे
लपवता येतात? असे सांगत गेल्या 60 वर्षांत झाला नाही, तो विकास 10
वर्षांच्या काळात करून दाखविल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी
केले. येवला तालुक्यातील सायगाव, पांजरवाडी, अंगुलगाव, भुलेगाव येथील
ग्रामपंचायत इमारत यासह विविध कामांचे उद्घाटन गुरूवारी पार पडले. या
वेळी भुजबळ म्हणाले, व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून प्रचार जरूर करा,
परंतु विचारस्वातंत्र्य सोडू नका, आपली र्मयादा सोडायची नाही व इतरांवर
टीका करायची नाही. त्यांचे अच्छे दिन आले ना, मग बस घरातून बंगल्यात गेले
हा विकास झाला नाही का असा टोलाही भुजबळ यांनी मारला. विकास कशाला
म्हणायचे हे आम्हाला कुणीही शिकवू नये. तुम्ही मला कागदभर विकासकामे
सांगितली, मी पुस्तक भरेल एवढी विकासकामे केली. परंतु, तालुक्यातील
पुढार्‍यांना विकासकामे दिसत नाहीत, हे मोठे दुर्भाग्य असल्याचे भुजबळ
म्हणाले. या वेळी अँड. माणिकराव शिंदे, राधाकिसन सोनवणे, प्रकाश वाघ,
शिवाजी भालेराव, प्रवीण गायकवाड, मकरंद सोनवणे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती शिवांगी पवार, नगराध्यक्ष शबानाबानो शेख
आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने