विहिरीत बुडून येवल्यात मायलेकींचा मृत्यूयेवला तालुक्यातील अंतरवेली  येथे मायलेकी विहिरीत पडून मृत झाल्याची घटना शुक्रवारी दि २५ जुलै सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंतरवेली येथील विवाहित महिला आशाबाई भाऊसाहेब गुंजाळ (वय २६) आणि तिची दीड वर्षाची मुलगी त्यांच्या शेतातील घराच्या पाठीमागील विहिरीत पडली, अशी माहिती गावचे माजी पोलीस पाटील अशोक गुंजाळ यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक बाबूराव बोडखे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा घातपात असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने