फिलिस्तीनमधील इस्त्राईली हल्याचा येवल्यात निषेध

येवला -- (पॅलेस्टिन) येथील निष्पाप मुस्लीम समाजाच्या कुटुंबावर रॉकेट लॉचरने बॉम्ब वर्षाव करून अत्याचार करणार्‍या इस्त्राईलचा येथील जमाअते इस्लामी हिंद शाखा येवला व शहर व तालुक्यातील मुस्लीम समाज बांधवांनी निषेध व्यक्त केला असून याबाबतचे निवेदन तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले.

इस्त्राईलने गाझापट्टी भागात पवित्र रमजान महिन्यात पॅलिस्टिनी मुस्लिमांची जीवित व वित्तीय हानी चालवली आहे. ती त्वरित थांबविण्यात यावी. या अत्याचारित घटना मानवतेच्या दृष्टीकोनातून अतिनिंदनीय आहे. आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आमच्या भावनांचा आदर करून शासन दरबारी मागण्या पाठवाव्यात.

भारत सरकारने इस्त्राईलशी कोणताही राजकीय, आर्थिक संबंध ठेवू नये, भारत सरकारने देखील या अत्याचारित घटनेचा निषेध करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी शहर काझी रफियोद्दीन शेख, जमाअते इस्लामीचे शहराध्यक्ष एकबाल अन्सारी, शकिलभाई शेख, मुश्ताक अन्सारी, मोमीनभाई शेख, अ.सबूर मोमीन, नगरसेवक रिझवान शेख, हेरमत शेख आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने