मतदानाची जबाबदारी पार न पाडणार्‍यांना कोणत्याही विषयावर बोलायचा अधिकार नाही - प्रा. नितीन बानगुडे पाटील

येवला - इंग्रजांनी दीडशे वर्षे हिंदुस्थानावर राज्य केले. त्याचे एकमेव
कारण म्हणजे, तोपर्यंत रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांचे झालेले विस्मरण.
मात्र, एकोणीसाव्या शतकात महाराजांचे स्मरण झाले आणि स्वातंत्र्याच्या
चळवळीने जोर धरला. स्वातंत्र्यासाठी पगारी कार्यकर्ते नव्हते,
प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. दुर्दैवाने आता
जबाबदारी टाळणार्‍यांचे टोळके वाढले आहे. राष्ट्रनिर्माणासाठी मतदानाची
जबाबदारी पार न पाडणार्‍यांना कोणत्याही विषयावर बोलायचा अधिकार नाही,
असे परखड मत शिवचरित्रकार प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी मांडले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे आयोजित
करण्यात आलेल्या कार्यक्रमात शिवचरित्रावर ते बोलत होते. 350
वर्षांपूर्वी जिजाऊंनी स्वराज्य सहकारी संस्थेची स्थापना केली.
त्यांच्याकडे व महाराजांकडे अंधर्शद्धेला थारा नव्हता. महाराजांनी अनेक
लढाया अमावास्येच्या रात्री लढल्या. दुर्ग मिळवताना नरदुर्ग उभे केले,
असे महाराजांचे विविध पैलू उलगडून दाखविताना प्रा. पाटील यांनी मातीत
मरणारे खूप असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, असे मत मांडले.
या वेळी माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, कारभारी आहेर,
चंद्रकांत शिंदे, ज्योती सुपेकर, सुशील गुजराथी, झुंजार देशमुख, रतन
बोरणारे, भास्कर कोंढरे, बाबा ढमाळे, शिवचरित्रकार दीपक काळे, र्शीराम
शिंदे, राजेंद्र लोणारी, प्रभाकर झळके आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने