धनगर समाजाचा येवला तहसील कार्यालयावर मोर्चा...............

येवला (प्रतिनिधी) अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीसाठी येवला तालुका
धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने बुधवार ३० जुलै रोजी शहरातील
विंचूर चौफुली परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील
कार्यालयापर्यंत सकाळी साडेबारा वाजेच्या सुमारास वाद्य वाजवित मोर्चा
काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाला
विरोध करणाऱ्यां राज्यकर्त्यांचा निषेध केला. मोर्चेकऱ्यांनी आरक्षण
आंदोलनात समाजबांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली.
पिवळा झेंडा फडकला, धनगर राजा भडकला असे फलक, व पिवळे झेंडे घेऊन २ हजार
च्या आसपास मोर्चेकरी तहसील कार्यालयावर धडकले.आंदोलनाचे नेतृत्व साईनाथ
गिडगे, बबन साळवे, दत्तात्रेय वैद्य, सुधीर जाधव आदिंनी केले.
यावेळी धनगर समाजास अनुसूचित जातीचे आरक्षण तसेच विविध प्रलंबित
मागण्यांचे निवेदन येवला तहसीलदार शरद मंडलीक यांना देण्यात आले.
समाजाकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी कसा पाठपुरावा होत आहे, याची माहिती
प्रमुख नेत्यांनी यावेळी दिली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन
छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात तालुक्यातील धनगर
समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
थोडे नवीन जरा जुने