येवला पोलिसांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.........

येवला पोलिसांनी केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.........
येवला (प्रतिनिधी) तरुणांनी सामाजिक बांधीलकी व सदभावना यांची जाणीव
ठेवावी व परिश्रमाने गुणवत्ता जोपासावी असे आवाहन येवला तहसीलदार शरद
मंडलिक यांनी येवला शहर पोलिस स्टेशन मध्ये शांतता समितीच्या बैठकीत
केले. रमजान ईद व श्रावणमासानिमीत्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन शहर
पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते.
या वेळेस पोलिसांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीमध्ये प्रांत वासंती माळी, मनमाडचे उपविभागीय पोलिस अधिक्षक नरेश
मेघराजानी, नगराध्यक्षा शबाना बानो, शफीक शेख आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांनी केले. प्रांत वासंती माळी
यांनी प्रशासकीय माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी अनंत गोंटला, हर्षल
देव्हडे,अर्चना घटे,प्रज्ञा पटाईत,शेख अलिया रईस,प्रियंका तायडे,वृषाली
खोजे,मंजूषा आहेर,माधुरी भड,पुजा शिंदे,गायत्री बोराडे,माहेश्वरी
भागवत,कोमल थोरात , संकेत साताळकर,सोमनाथ आहेर, पल्लवी साळवे, विनायक
धात्रक,कमलेश बनकर,अमोल दराडे,धरमचंद भामरे,वैभव जोरवेकर, प्रशांत ठोके
या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पो.ह
अभिमन्यू आहेर,कैलास महाजन,योगेश हेंबाडे,भाऊसाहेब टिळे व महिला पोलिस
कर्मचारी गीता शिंदे, दिपाली मोरे,उषा आहेर यानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी
परिश्रम घेतले. सुत्रसंचाल प्रसाद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमासाठी
शांतता समितीचे सदस्यांसह रुपेश लोणारी , मनोज दिवटे,अविनाश कुक्कर,दिनेश
आव्हाड,निलीमा घटे आदीसह नाहरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने