इस्रायल हल्ल्यांच्या निषेधार्थ येवल्यात मुस्लिमांचा मूकमोर्चा

येवला शहरातील मुस्लिमांनी येवला तहसील कार्यालयावर बुधवारी मूक मोर्चा
काढला. इस्रायलने पॅलेस्टाइनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा निषेध करीत
येवल्यात बुधवारी काढण्यात आलेल्या या मोर्चात मुस्लिम बांधव हजारोंच्या
संख्येने सहभागी झाले होते.
नगरसेवक रिजवान शेख, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, माजी नगरसेवक शफिक शेख,
नगरसेवक मुश्ताक शेख, जाफर घासी, युनुस शेख, शहर काजी रफिउदीन, सत्तार
शेख, शकिल शेख, बिलाल शेख, एजाज शेख, अयुब शहा, फारूक चमडेवाले, निसारभाई
निंबुवाले, मौलाना इस्माईल, मोहसीनभाई शेख, सलीम युसुफ, वहाब शेख, मुशरीफ
शहा, अकबर शहा, जिल्हा बँक माजी संचालक माणिकराव शिंदे, राष्ट्रवादीचे
युवा नेते कुणाल दराडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मूक मोर्चा
मोमीनपुरा भागातील पट्टनवाली मस्जिदपासून सकाळी 10 च्या सुमारास निघाला.
पुढे तो दुपारी सव्वाअकराला येवला तहसीलवर धडकला. 'इस्रायल शर्म करो,
मासुमो को मारना बंद करो' आशयाचे असंख्य फलक हाती घेत अन् दंडाला काळ्या
पट्टय़ा बांधत या मूक मोर्चात मुस्लिम सहभागी होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने