एन्झोकेम विद्यालयाच्या खेळाडूची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड

एन्झोकेम विद्यालयाच्या खेळाडूची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड
येवला : वार्ताहर
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयातील विद्यार्थ्याची ट्रॅडीशनल रेसलिंग स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड  झाली.एन्झोकेम विद्यालायातील इ 12 वी वाणिज्य शाखेतील
खेळाडू प्रसाद सोनवणे व
ई 11 वि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी प्राजक्ता खैरनार यांनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे विभागीय संकुलात पार पडलेल्या विभागीय ट्रॅडीशनल रेसलिंग या क्रीडा प्रकारात विजय संपादन करून प्रथम क्रमांक मिळवला, त्यामुळे याची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष सुशिलभाई  गुजराथी, सरचिटणीस संजय कांबळे, मुख्याध्यापक रामदास काहार, उपप्राचार्य जी.बी. गायकवाड, पर्यवेक्षक दत्ता महाले, याचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले. या खेळाडूना क्रीडाशिक्षक शेख रिजवान, विजय क्षीरसागर, प्रसेन पटेल, खोडके, सागर लोणारी
आदीचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने