चोरांची दहशत कशी थांबवणार ? विशाखाच्या बैठकीत गाजला चोर्यांचा मुद्दा
उषाताई शिंदे यांनी विचारला जाब, विशाखाची नविन कार्यकारणी जाहिर
येवला : वार्ताहर
महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात काम करण्यासाठी शासनाने विशाखा
समिती केलेल्या आहेत. महिलांना सातत्याने भेडसावणाऱ्या समस्यांसाठी
असलेल्या या समितीने आता पोलिसांना वाढत्या चोऱ्यांचा छडा लावण्यात
येणाऱ्या अपयशाकडेच लक्ष वेधले आहे. येथील शहर पोलिस ठाण्यात बोलवलेल्या
विशाखा समितीच्या बैठकीत महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यसाठीच्या
उपाययोजनांची चर्चा होण्याऐवजी शहरातील वाढत्या चोर्यांचा मुद्दा
प्रकर्षाने चर्चेला आला.
येवला शहर पोलीस ठाण्यात महिला पदाधिकार्यांची बैठक घेण्यात येऊन पोलीस
अधिकारी, कर्मचारी व सामाजिक योगदान देणार्या महिलांची समिती स्थापन
करण्यात आली. या बैठकीत बाजार समितीच्या सभापती व नगरसेविका उषाताई शिंदे
यांनी वाढत्या चोर्यांकडे पोलिस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांचे लक्ष
वेधले. साहेब, खुप चोर्या वाढल्या. एक तर तपास लावा किंवा चोर्या
थांबवा, अशा शब्दात त्यांनी व इतर उपस्थित महिलांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, महिला विशाखा समितीच्या सदस्यांनी यावेळी महिलांच्या
सुरक्षेच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित करुन सुचनाम मांडल्या. या
समितीत पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता
महाजन, पोलीस हवालदार अभिमन्यु आहेर, पोलीस नाईक वैशाली आव्हाड, पोलीस
कॉन्स्टेबल गिता शिंदे, दिपाली मोरे, मोसीना शेख, नायब तहसिलदार पुनम
दंडिले, उषाताई शिंदे, ऍड. राजश्री धांडे, डॉ. संगीता पटेल, प्रितीबाला
पटेल, हर्षा पटेल, शैला काबरा, छाया क्षीरसागर, लिलावती सोनवणे, मंदाताई
तक्ते, सविता बाबर, भारती येवले, राजश्री पहिलवान, शबानाबानो शेख, दुर्गा
भांडगे, रत्ना गवळी, लिलाबाई पेटकर, अलका जेजुरकर, भारती जगताप, मिना
तडवी, सरला निकम, निता परदेशी, जयश्री लोणारी, निलम घटे, सरोजीनी वखारे,
समिना शेख, तहेसिनबानो आजम, कोमल वर्दे आदींचा समावेश आहे.
विद्यार्थीना जाहीर आवाहन
तसेच यावेळी पोलिसांनी विद्यार्थीनींना देखील सुरक्षेच्या दृष्टीने
पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थींनींनी शाळेत
जातांना व्यक्ती किंवा तरुणाने छेड काढली तर घाबरुन न जाता तात्काळ
त्याचे मोटर सायकल नंबर तसेच नाव गाव आजुबाजुच्या विचारुन घेउन आपल्या
पालकांना कळवावे, तसेच जवळपास पोलीस कर्मचारी दिसल्यास त्यास त्याचे
वर्णन देवून माहिती द्यावी, मुलींना कोणी इशारा करुन आवाज देणे,
वेडेवाकडे करणे, नजरेने विभत्य वर्णन करणे, टॉन्ट मारणे, मोबाईलवर एस.
एम. एस. पाठविणे, मोटर सायकल वेडीवाकडी चालवुन कट मारणे, भिंती वर
अश्लील चित्र काढुन नाव टाकणे, एकतर्फी प्रेमातुन चिट्टी देणे, मुलींचा
वारंवार पाटलाग करणे, गाडीवर चित्र- विक्षीप्त अक्षरं याची माहिती देणे,
मोबाईल व अश्लील गाणे वाजविणे, मोबाईलवर अश्लील चित्र दाखविणे, एस.
एम. एस.- एम. एस. एस. पाठविणे, तसेच व्हॉट्स अप, फेसबुक वर अश्लिल चित्र
किंवा मजकुर पाठविणे, मिस कॉल करणे, असे प्रकार झाल्यास तात्काळ
पोलिसांशी संपर्क साधावा. विशेषत विंचुर चौफुली, जनता कॉलेज समोर, शनी
पटांगन, गंगा दरवाजा, बस स्टँन्ड व रिक्षा स्टॅन्ड, स्वामी मुक्तानंद
विद्यालयासमोर, एन्झोकेम विद्यालय समोर, फत्तेबुरुज नाका, मेन रोड असे व
क्लासचे ठिकाणी मुलांचा गर्दी गोंधळ दिसल्यास कळवावे, असे आवाहन पोलीस
निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी केले आहे.