खोडसाळीचा अजब नमुना............ दुकानाच्या कुलुपालाच लावले एम सिल...............

खोडसाळीचा अजब नमुना............
दुकानाच्या कुलुपालाच लावले एम सिल...............
येवला : वार्ताहर
खोडसाळपण करून त्रास देणे हा काहीचा विकृत छंद असतो. असाच अनुभव येवला
शहरातील विंचुर चौफुलीसारख्या गजबजलेल्या ठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर
शॉपींग सेंटर मधील कृषी सेवा केंद्र चालकाला आला. चोरट्यांच्या उच्छादाने
झोप उडालेल्या व्यावसायीकांसह सामान्य जनतेला आपले कुलुपबंद दुकान व घर
कधी फुटेल याचीच भिती लागून राहीलेली असतांना कुलुपाला एम सिल लावण्याचा
खोडसाळपणा अज्ञात व्यक्तीने केला.
भर चौकात अन् अवघ्या शंभर फुटावर पोलिस चौकी असलेल्या या दिलीप सिडस्
च्या दुकानदाराने मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी हजेरी लावताच
दुकानाच्या कुलुपाला एम सिल लावलेले पाहीले. अवघ्या मिनीट भरात कडक
होणारे एम सिल किल्ली लावण्याच्या ठिकाणी घातल्यामुळे दुकानदाराला दुकान
उघडण्यासाठी कुलुप तोडावे लागले. केवळ मानसिक त्रास देण्याच्या हेतूनेच
हा प्रकार झाला असल्याचे दिसून येत असले तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपींग
सेंटर मधील व्यावसायीकांच्या ओट्यावर घाण करणे, लघवी, संडास करणे हे
प्रकार नित्याचेच झाले असून या घटनेचा येवला व्यापारी असोसिएशनने निषेध
करून सहर पोलिसांकडे असे प्रकार घडू नये म्हणून मागणी केली आहे.
थोडे नवीन जरा जुने