येवला तहसिल कार्यालयात जागतीक ग्राहक दिन साजरा

 येवला तहसिल कार्यालयात जागतीक ग्राहक दिन साजरा
 


येवला - वार्ताहर
ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव असे ग्राहक पंचायतीचे सूत्र असल्याचे प्रतिपादन तहसिलदार नरेशकुमार बहिरम यांनी केले. येथील तहसिल कार्यालयात आयोजित जागतीक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहकांचे मुलभुत अधिकार, ग्राहकांचे हक्क यावर तहसिलदार बहिरम यांनी आपले मनोगतातून प्रबोधनपर व्याख्याण दिले. जनतेने खरेदीच्या वेळी दुकानदाराकडुन पावतीचा आग्रह धरावा असे अवाहनही त्यांनी केले.  ग्राहक समितीचे हरिष पटेल यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन व स्वागत गिताने झाली.  स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थीनी मानसी नाकोड, हर्षालिनी पांढरे, प्रिती शेजपुरे, वसुंधरा पाटील यांनी स्वागत गित सादर केले.  यावेळी घेण्यात आलेल्या वकृत्व स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या गौरी सावरगावकर व गायत्री कुककर्णी ह्या विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्रक व ग्रंथ भेट स्वरुपात देण्यात आले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे, सहा. निबंधक कार्यालयाचे बर्वे यांचेसह शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केमिस्ट असोसिएशनचे सदस्य तसेच तालुक्यातील व्यापारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागाचे बाळासाहेब हावळे, योगेश पाटील, पुष्कराज केवारे यांचेसह पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने