जळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन ...धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार

 


जळगाव नेऊर येथे 21 वर्षापासून होते शिवजयंतीला रक्तदान शिबीराचे आयोजन
धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार
येवला - वार्ताहर

जळगाव नेऊर ता.येवला येथे 21 वर्षापासून शिवजयंतीला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे यासाठी येथील धिंगाणा सोशल ग्रुपचा पुढाकार वाखाणण्यासारखा आहे.यात ग्रामस्थ व तरूणांचाही मोठ्या प्रमाणात सक्रीय सहभाग असतो.
बुधवार दि.15 रोजी तिथीनुसार आयोजीत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्व उपस्थितांकडुन विनम्र अभिवादन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर शिवव्याख्याते चंद्रकांत आव्हाड मरळगोईकर यांचे खरा शिवधर्म समजुन घ्या या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. रक्तदान प्रसंगी अर्पण रक्तपेढी नाशिक चे भाग्यश्री पवार, गुणवंत देशमुख, सुप्रिया मजगे, रूपाली मोरे, शामल गाडेकर, प्रविण सुर्यवंशी, गजानन कर्हाळे यांनी कामकाज बघीतले तर
यावेळ निलेश वाघ, दत्तात्रय शिंदे, नितिन शिंदे, रामनाथ शिंदे, प्रविण शिंदे, अरूण शिंदे, रविंद्र शिंदे, संतोष फापाळे, अंबादास शिंदे, चंद्रभान गुंड, आत्माराम शिंदे, गोकुळ शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पांडुरंग म्हस्के, प्रमोद वरे, सतिश ठोंबरे, संतोष ठोंबरे, गोविंद तांबे, तुकाराम रेंढे, दशरथ शिंदे, राधु शिरसाठ, वाल्मिक तांबे, अरविंद शिंदे, महेन्द्र संधान, नवनाथ गवळी, सागर कुर्हाडे, नितिन चव्हाणके, गणेश वाघ, राहुल कदम, श्रीराम जुगृत, ज्ञानेश्वर गुंड, रमेश कदम, डाॅ.बाबासाहेब साताळकर, कृष्णकांत आहेर, नितिन दाते, तौसिफ शेख, रोशन तांबे, गणेश गायकवाड , पप्पु शिंदे, संतोष वाघ व अमोल शिंदे अशा 41 तरूणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी धिंगाणा सोशल ग्रुप, रायगड ग्रुप, साई सिद्धी ग्रुप, मोरया ग्रुप, तरूण मित्रमंडळ मुखेड फाटा, रंगिला क्रिकेट संघ, तरूण वर्ग, ग्रामस्थ आदींनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी भव्य मिरवणुकीचेही आयोजन केले होते.
फोटोखाली- जळगाव नेऊर ता.येवला येथे शिवजयंती निमित्त आयोजीत रक्तदान शिबिरप्रसंगी उपस्थित रक्तदाते व दुसरे छायाचित्रात व्याख्यान देतांना शिवव्याख्याते चंद्रकांत आव्हाड मरळगोईकर व उपस्थित ग्रामस्थ आदी.


थोडे नवीन जरा जुने