मधुमेही रुग्णांसाठी शनिवारी मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन
जनकल्याण सेवा समिती व तुलसी आय हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम
येवला - वार्ताहर
शहरातील माधवराव पाटील संकुलासमोरील सप्तश्रृंगी देवी मंदिरात १८ मार्च शनिवार रोजी मधुमेही रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जनकल्याण सेवा समिती येवला व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. व्ही. आर. जुहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमहजन्य दृष्टीपटल विकृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेही रुग्णांनी रेतीनापॅथी डोळे तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. ही तपासणी न झाल्याने व रक्तातील साखर नियंत्रणात न राहिल्याने अनेक मधुमेही रुग्णांची दृष्टी अंधुक होत जाते. भविष्यातील दृष्टी हानीचे धोके टाळण्यासाठी या तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ज्या रुग्णांना गरज आहे, अशा रुग्णांच्या डोळ्याच्या पडद्यावरील एंजोग्रॉफी व लेझर उपचार तुलसी आय हॉस्पिटलच्या वतीने अत्यल्प दरात केले जाणार आहे. तपासणीसाठी शिबिरात फक्त मधुमेह निधान असणार्यांचीच डोळे तपासणी केली जाणार असून मधुमेह रुग्णांनी नेत्र तपासणीसाठी कागदपत्रे सोबत आणावी, असे आवाहन जनकल्याण सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सदर शिबिर सुरु राहणार असून शहरातील किरण मशिनरी स्टोअर्स (भ्रमणध्वनी क्र. ९९७५२७१४०९), दिगंबर कुलकर्णी शनिमंदिर (९८८१९५९३८०), नंदलाल भांबारे (९२२०३४९२६६), बॉम्बे झेरॉक्स, प्रभाकर झळके, मुकेश लचके, गोविंदराव खराडे यांच्याकडे नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.