शासनाने फिरवली पाठ,सहकारी शिक्षकांनी दिला मदतीचा हात

 


शासनाने फिरवली पाठ,सहकारी शिक्षकांनी दिला मदतीचा हात
 
येवला – वार्ताहर
पेन्शन योजनेतील बदलामुळे सर्वच स्तरातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे भविष्य अंधकारमय झालेले आहे. त्यात असे कर्मचारी अकाली मृत्युमुखी पडल्यास त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबींयही उघड्यावर येत आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असली तरी आपल्या सहकाऱ्याच्या अकाली मृत्युनंतर त्याच्या कुटुंबींयासाठी मदतनिधी देण्याचा मोठेपणा येवला तालुक्यातील शिक्षकांनी दाखवला. 
दि.५.०३.२०१७ रोजी "जुनी पेंशन हक्क संघटन शाखा-येवला च्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सहकारी शिक्षक आणि संघटनेचे कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकी म्हणुन ता.सुरगाणा जि. नाशिक येथील मृत शिक्षक बांधव स्व.कैलास पवार यांच्या परिवारास फुल न फुलाची पाकळी म्हणुन मदतनिधी ५७०००रु चा चेक व २००० रु रोख तात्काळ मदतीच्या स्वरुपात असे ५९००० रुपये व कु.ग्रिष्मा कैलास पवार साठी एक छोटीशी भेट अशा स्वरुपातली मदत येवला टिमने सुपुर्द केली. अशी मदतनिधी जमा करुन देण्याची वेळ आज देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांवर यावी यासारखे दुर्दैव कोणते ?. असा सवाल शिक्षक वर्गातून उठवला जात आहे. आज जलद प्रगत महाराष्ट्र घडवणारा शिक्षकच आर्थिकदृष्ट्या असुरक्षित आहे,त्याच्यानंतर त्यांचे कुटुंबही उघड्यावरच पडते यासाठी शासनाचे उदासीन धोरण जबाबदार असल्याचाही आरोप शिक्षकांनी केला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात संघटनेने वारंवार आंदोलने केली तसेच पाठपुरावाही केला तरीही शासन उघड्या डोळ्यांनी शिक्षकांचे बळी जाताना पाहत आहे. याविरोधात पेन्शनवंचित शिक्षकांत असंतोष आहे.
 
शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचारयांना जुनी पेन्शन बंद करुन जाचक अशी DCPS योजना लागु केली जी फारच असुरक्षीत असुन नोकरी करत असताना जर कर्मचारयाचा मृत्यू झाल्यास त्याला व त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला कसलेच आर्थिक संरक्षण नाही. पाच वर्षासाठी निवडुन येणारया लोकप्रतिनीधीला भरगच्च पेन्शन अन् आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा करणारा शिक्षक मात्र बेवारसच. या विषयी शिक्षकांत नैराश्याचे वातावरण आहे.
 
रविवारी दि.५ मार्च रोजी मयत शिक्षकाच्या कुटुंबींयाना मदतनिधी देताना टिम येवला ने पवार परिवाराचे सांत्वन केले व स्व.कैलास पवार सरांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कैलास पवार सरांचे वडील भावनाशिल झाले तेंव्हा सर्वच शिक्षकांच्या डोळ्यात अश्रु आले होते. यावेळी येवला जुनी पेन्श्न हक्क संघटन येवलाचे तालुकाध्यक्ष विजय राहींज, तालुका सरचिटणीस अमित कलगुंडे ,तालुका उपाध्यक्ष किरण पेंडभाजे , तालुका समन्वयक सुनिल कैरमकोंडा  व जिल्हा प्रतिनीधी गजानन देवकाते तसेच सुरगाणा टिमचे अविनाश जुमडे ,दिपक परचंडे ,भागवत धुम,काळु भोये, विशाल पाटील, प्रताप देशमुख, कैलास बागुल इ. शिक्षक हजर होते. यावेळी शरद पवार जे पोस्ट खात्यातील प्रतिनीधी आहेत त्यांनी सुकन्या योजना व इतर योजनांविषयी माहीती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शासनाने जुनी पेंशन योजना लागू करून कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
**************-***************-**************-************************-************
कैलास पवार सर हे प्राथ. शिक्षक म्हणुन जि.प.शाळा भरडमाळ ता. सुरगाणा येथे कार्यरत होत.मुळ गाव हरणटेकडी व हल्ली मुक्काम सराड येथे होता . स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी ते दररोज सकाळी व्यायामासाठी जात दि.8डिसें 2016 रोजीही ते असेच पहाटे व्यायामासाठी गेले होते परतिच्या वेळेस वणिकडुन बोरगाव सापुतारयाकडे जाणारया वाहणाने त्यांना धडक दिली अन त्याचा मार मेंदूला बसुन मेंदुतील अतिरीक्त रक्तस्रावामुळे त्यांना वाचवता आले नाही. नाशिक येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या कुटुंबात तेच कर्ते होते मृत्युवेळी त्यांची मुलगी अवघ्या नऊ महिन्याची होती.
**************-***************-**************-************************-************

 

स्व.कैलास पवार सर सुरगाणा यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून जुनी पेंशन हक्क संघटन शाखा-येवला च्या माध्यमातून येवला तालुक्यातील समस्त शिक्षक बांधवांनी  खालिलप्रमाने केंद्रनिहाय मदतनिधि दिला होता.

 

१.सायगाव-१००००

२.कुसमाडी-७८५०

३.सोमठान देश-५७००

४.भारम-५५००

५.बोकटे-५२५०

६.राजापुर-५२००

७.सावरगांव-४५००

८.नगरसुल-४३५०

९.गवंडगाव-३७००

१०.देशमाने-३१००

११.नागडे-८००

१२.चिचोंड़ी-५००

१३.पाटोदा-५००

१४.अंगणगाव-५००

 १५.जळगाव नेऊर-२००

 १६.अंदरसुल-१६००

 

असे एकूण-५९२५० रुपये जमा करण्यात आले होते.त्यापैकी ५७०००रु चा चेक सुकन्या योजनेसाठी स्व.कैलास पवार यांच्या पत्नीच्या नावे देण्यात आला. तसेच २०००रु तात्काळ खर्च आणि खाते उघडण्यासाठी रोख स्वरुपात देण्यात आले.आणि सरांच्या छोट्या चिमुकली साठी ड्रेस आणि खाऊ यासाठी २५०रु खर्च करण्यात आले.

 

 


थोडे नवीन जरा जुने