येवला, अंदरसुल बाजार समिती मध्ये यापूढे शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात : सौ. उषाताई शिंदे

येवला,  अंदरसुल बाजार समिती मध्ये यापूढे शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात : सौ. उषाताई शिंदे

 येवला  - वार्ताहर

येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार येवला व उपबाजार अंदरसुल येथील परवानेधारक खरेदीदार व्यापारी, बाजार समितीच्या सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांची संयुक्त बैठक शनिवारी सकाळी ११.०० वाजता बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. त्यामध्ये भारत सरकारच्या दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या निर्णयानुसार चलनामधून रु. ५०० व रु. १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे खरेदीदार व्यापारी शेतकर्‍यांना शेतीमालाचे पेमेंट दि. १० नोव्हेंबर २०१६ पासून चेकने अदा करीत होते. परंतु शेतीमालाचे चेक वटण्यास उशिर होत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीमालाचे पौसे लवकर मिळत नव्हते. शासनाने दि. १३ मार्च २०१७ पासुन बँकेतून रोख रक्कम काढण्यावरील मर्यादा हटविल्याने दि. १ एप्रिल २०१७ पासुन शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात देण्यात यावे याबाबत बौठकीत विचार विनिमय झाला व त्यास सर्व खरेदीदार व्यापार्‍यांनी संमती दिलेली आहे. 
सोमवार दि. ३ पासुन मुख्य आवार येवला येथील शेतीमालाचे लिलाव सुरु होत असून उपबाजार अंदरसुल येथील शेतीमालाचे लिलाव शुक्रवार दि. ७ पासुन सुरु होत आहेत. तेव्हा शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल बाजार समिती मध्ये विक्रीसाठी आणून बाजार समितीस सहकार्य करावे व शेतीमालाची रक्कम रोख स्वरुपात घेवून जावी असे आवाहन सभापती सौ. उषाताई शिंदे यांनी केलेले आहे.
या प्रसंगी बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे, उपसभापती  गणपतराव कांदळकर, संचालक संतु पा. झांबरे, नंदुशेठ आट्टल, सुभाषशेठ समदडीया, सदस्य सचिव डी. सी. खौरनार तसेच व्यापारी गितेष गुजराथी, उमेशकुमार आट्टल, अनिकेत आट्टल, योगेश सोनी, हसन शेख, अंजुम शेख, मनोज समदडीया, प्रणव समदडीया, संकेत पटणी, प्रभाकरशेठ ठाकूर, ओंकारेश्वर कलंत्री, जयेश ठाकूर, केशव शिंदे, मनोज कासलीवाल, गोरख पवार, शंकर कदम, गोरख भागवत, शिवनारायण चांडक, शरद श्रीश्रीमाळ, अंदरसुल येथील व्यापारी नामदेव माळी, साहेबराव ढोले, भिकाजी माळी, विलास गाडे, सचिन पौठणकर, बाळनाथ धुमाळ, सागर धुमाळ, निवृत्ती ढोले, सुनिल आट्टल, नितीन देशमुख, संजय सैंद्रे, संतोष सोनवणे, शिवाजी ढोले व इतर व्यापारी बांधव उपस्थित होते. 
थोडे नवीन जरा जुने