बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...

बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा...

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , बनकर पाटील पब्लिक स्कूल, अंगणगाव येथे १५ ऑगस्ट २०१७ सकाळी ठीक १०.०० वाजता कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी  येवला पंचायत समिती चे गट शिक्षण  अधिकारी मा.श्री . वाघमारे एम.आर. यांच्या शुभ हस्ते व मा. श्री. अंबादास बालाजी बनकर याच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहणाचा कार्यक्रम  संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे सल्लागार अॅड. श्री. दीपकजी पवार सर व संस्थेचे अध्यक्ष तथा येवला न.पा चे विद्यमान नगरसेवक मा.श्री.प्रवीण भाऊ बनकर व पालक प्रतिनिधी श्री.अल्केश कासलीवाल  उपस्थित होते.

          ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत सादर केले. तद्नंतर विद्यार्थ्यांनी लाठी काठी या साहसी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेचे विद्यार्थी चव्हाण श्रुती, बनकर गीता , चव्हाण ऋतुजा , वारुळे सदिच्छा ,वाणी तनुजा , कासलीवाल अर्जव , साताळकर अर्णव, यांनी देशभक्तीपर भाषण  केले.

तसेच यावेळी श्री .वाघमारे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .तसेच पूर्व प्राथमिक च्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तांची वेशभूषा करून उपस्थितांची वाहवाह मिळविली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य  श्री.निकम पंकज यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने