अनकाई किल्यावरील तळ्यात बुडुन कासारखेडे येथील युवकाचा मृत्यु

 अनकाई किल्यावरील तळ्यात बुडुन कासारखेडे येथील युवकाचा मृत्यु

येवला । तालुक्यातील कासारखेडे येथील युवक योगेश गायकवाड (वय २१) हा अनकाई किल्यावरील तळ्यात पोहत असतांना तळ्यातील गाळात अडकुन त्याचा मृत्यु झाला.
शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने योगेश गायकवाड हा त्याचे मित्रासमवेत अनकाई येथील किल्यावर यात्रेसाठी गेला होता.  दरम्यान योगेश हा किल्यावरील तळ्यात पोहोत असतांना तळ्यातील गाळात पाय अडकल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.  सदर घटने बाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात आकसत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पो.उपनिरीक्षक एस.के. निकम हे करीत आहे.  योगेश हा कासारखेडे येथील साहेबराव गायकवाड यांचा चिरंजीव असुन त्याच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ बहीण, असा परीवार आहे.  योगेशच्या निधनाने गावपरिसरात शोककळा पसरली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने