येवल्यातील फेटा कलाकाराचे मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले कौतुक

 येवल्यातील फेटा कलाकाराचे मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले कौतुक



येवला । सेनापती तात्या टोपे यांची जन्भुमी असलेले हे येवला शहर जसे पैठणीसाठी संपुर्ण जगात प्रसिद्ध आहे तसे फेट्यासाठीही लवकरच सर्वदुर प्रसिद्ध होत असुन त्यात श्रीकांत खंदारे सारख्या कलाकाराचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण व राजशिष्टारमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.  येवल्यातील खंदारे यांच्या फेटा शोरुला भेटी दरम्यान ते बोलत होते.
येवले शहराचा ऐतीहासीक फेटा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश विदेशातील अनेक दिग्गजांनी बांधला आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.  येवल्याची संस्कृती असलेला हा फेटा जगाला मार्गदर्शन करणारा आहे त्यामुळे त्याचे संवर्धन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशिल असल्याचे आश्‍वासन शिंदे यांनी यावेळी दिले.  चौंडी या गावात एका समारंभात खंदारे यांची फेटा बांधण्याची कला पाहुन त्यांच्याशी झालेल्या अल्पशा परिचया दरम्यान येवला दौर्‍या प्रसंगी नक्की भेट देणार असल्याचे आश्‍वासन पाळुन ना.शिंदे यांनी येवल्यातील श्रीकांत खंदारे यांच्या फेटा शोरुला भेट दिली.  यावेळी खंदारे परिवारातील सदस्यांसोबत अल्पोपहार व चहापानाचा आनंद त्यांनी घेतला.  याप्रसंगी सर्वसामान्य कुटुंबातील हा फेटा कलाकार व त्याची कलेची जिद्द पाहुन भरभरुन कौतुकही त्यांनी केले. 
याप्रसंगी नगरसेवक प्रमोद सस्कर, भाजपाचे शहाराध्यक्ष आनंद शिंदे, श्रीकांत खंदारे, संतोष खंदारे, पांडुरंग खंदारे, मुकुंद सोनार, मयूर पंड्या, गणेश खळेकर आदी उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने