अनकाईकरांनी लोकसहभागातून काढला दोन हजार डंपर गाळ शेतीही झाली सुपीक,सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी होणार फायदा

 


अनकाईकरांनी लोकसहभागातून काढला दोन हजार डंपर गाळ

शेतीही झाली सुपीक,सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी होणार फायदा  

 

येवला 


गावाची एकजूट असली की कुठले काम अशक्य राहत नाही. असेच अशक्य ते शक्य करून दाखविले आहे.अनकाई येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून येथील खंबीटी बंधार्यातून तब्बल २५ हजार ब्रास म्हणजेच दोन हजार डंपर गाळ काढला गेला असून यामुळे पाणीपातळीत वाढ होण्यासह शेकडो एकर जमीन देखील सुपीक झाली आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या अनकाईला पावसाचे मोठे प्रमाणात पाणी वाहून येते. मात्र या सर्व पाण्याची साठवणूक होणे गरजेचे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या बंधाऱ्यातून पाणी येते. त्या खंबीटी बंधाऱ्यांचा प्रचंड गाळ काढला गेल्याने यापुढे निसर्गाने साथ दिल्यास गावचा पाणीप्रश्न सुटणार आहे. लोकसहभागातून पंचवीस हजार ब्रास गाळ काढला गेल्याने या बंधाऱ्यांची साठवण क्षमता वाढली आहे. शिवाय या गाळाचा उपयोग शेती सुपीक करण्यासाठी झाला आहे. यामुळे पावसाळ्यात नक्कीच दुहेरी फायदा फायदा या गावाला मिळू शकणार आहे.

काढलेल्या या बंधार्याची पाहणी नुकतीच तहसीलदार नरेशकुमार बहिरम,गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी केली.गाळ काढण्यासाठी गावाचे योगदान व गावाला होणारा फायदा या संदर्भात यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी बहिरम व आहिरे यांना माहिती दिली. यावेळी सरपंच प्रतिभा वैद्य,ज्येष्ठ नेते बाबूशेठ कासलीवाल,सोसायटीचे अध्यक्ष गणपत देवकर,संतोष वैद्य,राजू नंदाळे,नगीनाबाई कासलीवाल,बाळू आहिरे, संजय वैद्य,किसन व्यापारी,माजी सभापती शोभा जाधव,किरण जाधव,बाळकृष्ण सोनवणे,विलास आहिरे,भावराव सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

"शेतकर्यांनी या मोहिमेत हिरारीने सहभाग घेतल्याने गावाला दुहेरी फायदा होणार आहे.यामुळे पाणीसाठा वाढणार आहेतच पण शेती सुपीक होऊन सिंचनाखाली देखील येणार आहे."

-प्रतिभा वैद्य,सरपंच,अनकाई

 

अनकाई : लोकसहभागातून येथील खंबीटी बंधार्यातून काढलेल्या गाळाची माहिती तहसीलदार नरेशकुमार बहिरम,गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांना देतांना डॉ. सुधीर जाधव व ग्रामस्थ. 

 
 

थोडे नवीन जरा जुने